---Advertisement---

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष ट्रेन धावणार

by team
---Advertisement---

भुसावळ :  सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी संबळपूर ते पुणे दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०८३२७ संबळपूर-पुणे विशेष गाडी १७ ते ३१ मार्चदरम्यान प्रत्येक रविवारी संबळपूर येथून दहा वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे २.४५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०८३२८ पुणे-संबळपूर विशेष गाडी १९ ते २ एप्रिलदरम्यान प्रत्येक मंगळवारी पुणे येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संबळपूर येथे १.३० वाजता पोहचेल. या गाडीला बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ़, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, लाखोली, रायपूर, दुर्ग, राज नांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment