---Advertisement---
रेल्वे: रोज लाखो नागरिक प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वांना परवडणारा असतो म्हणूनच सर्व नागरिक रेल्वाला पसंती देतात.दरम्यान, रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वकडून अनेक गाड्या चालविल्या जात आहे. अश्यातच रेल्वेने एक साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही ट्रेन मुंबई ते उत्तर प्रदेश मधील मऊ दरम्यान एक साप्ताहिक ट्रेन चालवली जाणार आहे. रेल्वे विभाग गाडी क्रमांक 15181 ही ट्रेन अप मार्गांवर आणि गाडी क्रमांक 15182 ही डाऊन मार्गावर सूरू करणार आहे. नवीन ट्रेन मऊ स्थानकापासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलपर्यंत सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजेच ही गाडी भुसावळसह जळगाव स्थानकांवर थांबेल. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.
या स्थानकांवर थांबेल
एलटीटी, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फुलपूर, जंघाई, मडियाहुन, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगड, मुहम्मदाबाद आणि मऊ.
15181 मऊ-एलटीटी स्पेशल ट्रेन १६ डिसेंबरपासून दर शनिवारी मऊ येथून रात्री १०.१५ वाजता धावेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता एलटीटी पोहोचेल. तसेच 15182 दर सोमवारी, 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.10 वाजता एलटीटीहून सुटेल, तर दुसऱ्या सायंकाळी 6.30 वाजता मऊ येथे पोहोचेल. ट्रेनमध्ये एकूण २१ डबे आहेत. सात स्लीपर कोच, सहा एसी तीन इकॉनॉमी कोच, दोन एसी दोन डबे, चार जनरल क्लास डबे आणि एक एसएलआरडी क्लास कोच आहेत.या गाडीमुळे मुंबई ते उत्तर प्रदेश चा प्रवास अधिक गतिमान होईल अशी आशा असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---Advertisement---