भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक बडनेरा या गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. भुसावळसह विभागातील विविध रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होणार असून जागेचा प्रश्न मिटणार आहे. रेल्वेतर्फे रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढविला आहे, यामुळे भुसावळ विभागासह विभागातील विविध रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार – आहे. विशेष म्हणजे बडनेरा-नाशिक ही गाडी प्रवाशांना अधिक फायदेशीर न आहे. रेल्वेने मुदत वाढ केलेल्या रेल्वे गाड्यामध्ये ०१०२५ दादर ते बलिया विशेष गाडीला ३० जून २०२४ पर्यंत तर ०१०२६ बलिया ते दादर विशेष गाडीला ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
०१०२७ दादर ते गोरखपूर विशेष गाडीला ३० जून २०२४ पर्यंत तर ०१०२८ गोरखपूर ते दादर विशेष गाडीला २ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. ०११३९ नागपूर ते मडगांव द्वि-साप्ताहिक गाडी ८ जून २०२४ पर्यंत तर ०११४० मडगाव ते नागपूर द्वि-साप्ताहिक गाडी ९ जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे. ०१२११ बडनेरा ते नाशिक ही गाडी ३१ ऐवजी ३० जूनपर्यंत चालविण्यात येईल ०१२१२ नाशिक ते बडनेरा ही गाडी ३० जुनपर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे कळवण्यात आले आहे