नवी दिल्ली : देशातील अव्वल तंत्रज्ञान असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची नवीन आवृत्ती लवकरच येणार आहे भारतीय रेल्वे पुढील वर्षी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आराम आणि सुरक्षितेच्या दृष्टीने खूपच चांगली असणार आहे. या ट्रेनमुळे विमानांची क्रेझी कमी होईल असे बोलले जात आहेत स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही जागतिक दर्जाच्या गाड्यांपैकी एक असेल ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन असणार आहे अध्यायावत केलेल्या रेल्वे रुळांमुळे ही ट्रेन ताशी 200 किलोमीटर वेगाने धावेल प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे कमी वेळात इच्छित स्थळी पोचले पोहोचणे शक्य होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी 2019 मध्ये दिल्ली आणि वाराणसी दरम्यान प्रथम सुरू करण्यात आली होती तेव्हापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या सध्या देशात 34 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत.