प्रशांत दामलेंच्या ‘तिकिटालय’चा शुभारंभ ; ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त घोषणा

Prashant Damle : ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेआणि अशोक सराफ यांच्या हस्ते लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘तिकिटालय’ चा शुभारंभ करण्यात आला आहे.

मराठी मनोरंजनाचे तिकीट काढणाऱ्या रसिकांना भरपूर माहितीसह एखादं हक्काचं तिकीट बुकिंग ॲप हवं, या जिद्दीने प्रशांत दामले, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम यांनी एकत्र येत पीएसी थिएटर एंटरटेनमेंट प्रा. लि (PAC) अंतर्गत हे ‘तिकिटालाय’ॲप मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत सादर केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते ‘महाराष्ट्रभूषण’ अशोक सराफ, ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘तिकिटालय’ या मनोरंजनात्मक तिकीट बुकिंग ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

या ॲपमुळे जगभरातील मराठी प्रेक्षक मोठया प्रमाणात जोडला जाईल. प्रेक्षक त्याच्या आवडीचं सहज शोधेल आणि अवघ्या 3 किल्कवर संपूर्ण माहिती घेऊन तिकीट बुक करू शकेल अशा रीतीने ‘तिकिटालाय’ ॲपची मांडणी केली आहे. संपूर्ण भारतात हा ॲप कोणीही डाऊनलोड करू शकतो.