प्राचार्यांच्या रिक्त पदांसह प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत शिक्षण संचालकांना साकडे

जळगाव:  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विद्याशाखांच्या सुमारे १०८ महाविद्यालयात प्राचार्य व प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत विद्यापीठासह राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांना साकडे घालणार असल्याची माहिती एन. मुक्ता. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बारी यांनी ‘तरुण भारत’ला दिली. जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.

ही पदे भरण्याबाबत विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने सध्या तरी दुर्लक्ष केले आहे. याचा विपरीत परिणाम केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबावणीवर होणार आहे. नवे शैक्षणिक धोरण देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठात टप्याटप्याने लागू करण्यात येत आहे.प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासह विविध समस्या सोडवाव्यात यासाठी ७ मार्चला पुण्यात उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची भेट घेणार असल्याचे एन. मुक्ता. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नितीन बारी यांनी सांगीतले. पुण्याला आज घेणार भेट एन. मुक्तत्र संघटनेतर्फे प्राचार्यांची

विनाअनुदानीत महाविद्यालयातील पदे जास्त रिक्त
याबाबत विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता अनुदानित महाविद्यालयात प्राचार्याची पदे तशी कमी रिक्त आहेत. मात्र विना अनुदानित महाविद्यालयात प्राचार्यांची पदे जास्त रिक्त आहेत. ती पदे त्यांनी भरली पाहिजेत. यासाठी विद्यापीठाकडून तसे पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात रिक्त असलेले प्राचार्य पद आणि प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत विद्यापीठाला पत्र देणार आहे. तसेच व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही याबाबत चर्चा करणार आहोत. तसेच याबाबत शासनाच्या उच्च शिक्षण विभागालाही कळविणार आहोत. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्राचार्य व प्राध्यापकांची रिक्त पदे न भरल्यास त्यांची मान्यता काढण्याचे अधिकार विद्यापीठाला आहेत. त्यानुसार विद्यापीठ पुढील निर्णय घेईल.
-डॉ. संजय ठाकरे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, जळगाव