प्राचार्य नियुक्त न केल्यास येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश नाकारणार !

डॉ. पंकज पाटील
जळगाव :   
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या विविध शाखांच्या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यांनी येत्या शैक्ष्ाणिक वर्षाच्या सुरवातीपर्यंत प्राचार्य पद भरण्याची कार्यवाही नियमानुसार पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास त्या महाविद्यालयांना जून 2024 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर बंदी आणण्याची कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.एस.टी. इंगळे यांनी ‌‘ तरूण भारत‌’शी बोलताना दिली.

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्ष्ाणिक धोरण लागु केले आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या सर्व महाविद्यालयात त्ो टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.  त्याची सुरवात जून 2024 पासून करण्यात येत आहे.

प्रशिक्ष्ाणासह जागृतीवर भर

नवे शैक्ष्ाणिक धोरण कसे आहे. त्याचा पदवी त्ो पदव्युत्तर पदवीपर्यतचा अभ्यासक्रम कसा असेल, किती विषय असतील, परिक्ष्ाा पध्दत कसे असेल,

मार्किंग सिस्टीम कशी असेल, गुणपत्रक कसे असेल यासह विविध माहिती विद्यापीठातर्फे देण्यात येत आहे. यात विद्यापीठासह महाविद्यालयातील  विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक, विविध विद्यार्थी संघटना यांना प्रशिक्ष्ाणासह बैठकांमधुन माहिती देण्यात येत आहे.

नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांना प्रवेश नाकारले

दर पाच वर्षानी विद्यापीठासी महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मूल्यांकन करणे गरजेचे असत. यात काही महाविद्यालयानी नॅक ॲक्रीडेशन केले आहे. तर काही महाविद्यालयांनी केलेले नव्हत्ो. त्यामुळे त्या महाविद्यालयांना विद्यापीठाने जन 2023 मध्ये प्रथम वर्षास प्रवेश देण्याच बंदी आणली होती. त्यामुळे या महाविद्यालयांनी आता नॅकची तयारी पूर्ण करून तसे प्रस्ताव युजीसीकडे पाठविले आहेत. त्यानुसार युजीसीकडून नॅक कमिटी महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी येत आहेत.

ती विनाअनुदानीत महाविद्यालये

याबाबत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ही महाविद्यालये विना अनुदानीत आहेत. त्यामुळे त्ोथील प्राचार्यपदे रिक्त असल्याचे सांगीतले.

 तर जून पासून प्रवेश बंदी..

 नवे राष्ट्रीय शैक्ष्ाणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासह महाविद्यालयाच्या विविध कामाकाजासाठी पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. अनुदानीत महाविद्यालयातील रिक्त प्राचार्यांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर विनाअनुदानीत महाविद्यालयाना ही पदे भरण्याबाबत सांगण्यात येणार आहे. येत्या जून पर्यत त्यानी प्राचार्याची पदे भरली नाही तर

येत्या शैक्ष्ाणिक वर्षात त्यांना प्रथम वर्षास प्रवेश देण्यास बंदी करण्यात येईल. तरीही त्यांनी प्रवेश दिला तर त्यास मान्यता देण्यात येणार नसल्याचे प्र-कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे यांनी सांगीतले.