प्राणप्रतिष्ठेला देशभर दिवाळी साजरी करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

अयोध्या: येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विकास आणि वारसा यांची शक्तीच देशाला पुढे नेणार आहे. २२ जानेवारीचा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सायंकाळी ‘श्रीराम ज्योत लावावी आणि हा दिवस देशभरात दिवाळीसारखाच साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासीयांना केले. एक काळ असा होता, जेव्हा प्रभू अशी इच्छा प्रत्येक नागरिकाच्या श्री राम एका साध्या टेंटमध्ये विराजमान होते.

आता त्यांना पक्के घर मिळाले आहे. केवळ रामललांनाच नव्हे तर, देशातील चार कोटी गरिबांनाही त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळाले, असे मोदी यांनी सांगितले. अयोध्येतील अत्याधुनिक अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केल्यानंतर आयोजित भव्य जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करीत होते. २२ जानेवारीच्या ऐतिहासिक सोहळ्यात आपणही सहभागी व्हावे, मनात ११,२०० कोटी रुपयांची भेट पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या दौऱ्यात अयोध्येसह उत्तरप्रदेशला ११,२०० कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ आणि शिलान्यास करून मोठी भेट दिली. याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचेही लोकार्पण केले.

यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.जागृत होणे स्वाभाविक आहे. मात्र, माझी त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी पावे. कारण, पहिल्या दिवशी केवळ तेच लोक येथे येऊ शकतात, ज्यांना रितसर आणि आग्रहाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. सर्वांनी एकाच दिवशी येथे येण्याचा प्रयत्न केत्यास फार गर्दी होईल आणि त्या सर्वानाच दर्शन घेणे शक्य होणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अयोध्येला स्वच्छ, स्मार्ट नगरी बनवा

अयोध्येमधील केलेल्या विविध विकास कामांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्या विमानतळाचे नाव महर्षी वाल्मीकि यांच्यावरून ठेवण्यात आले, याचा मला आनंद आहे. येथे रामललाचे भव्य मंदिर उभे राहिल्यानंतर जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येणार आहेत आणि रामललाच्या दर्शनाची प्रक्रिया अनंत काळपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे माझे विशेषतः अयोध्यावासीयांना आवाहन आहे की, त्यांनी अयोध्येला देशातील सर्वांत स्मार्ट आणि स्वच्छ शहर म्हणून विकसित करण्यात योगदान द्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.