राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेयसीने तिच्याच प्रियकरावर अत्याचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. महिलेचा आरोप आहे की तिचा प्रियकर तिला अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असे. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर तपासात समोर आले की, ती महिला तिच्या स्वेच्छेने तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यासाठी दोघांनी करारही केला होता. सध्या या कराराच्या आधारे न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर केला आहे.
पश्चिम दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. 19 डिसेंबर 2023 रोजी महिलेने तिच्या जोडीदाराविरुद्ध पश्चिम दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या जोडीदाराने तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तरुणाने तिचा अश्लिल व्हिडिओही बनवला. या व्हिडीओच्या आधारे तो तरुण रोज तिला ब्लॅकमेल करत असे आणि अनेकवेळा तिच्यासोबत चुकीचे कृत्यही केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तरुणाला जामीन मिळाला
सध्या दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून व करार पाहून न्यायालयाने तरुणाला जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे म्हणणे आहे की दोघांनी एकत्र राहण्याचे प्रतिज्ञापत्र केले आहे, त्याला कायदेशीर वैधता नसली तरी ते दोघेही संमतीने एकत्र राहत होते हे सिद्ध होते.