प्लास्टिक उद्योगासाठी कॉमन इटीपी सेंटर उभारणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

जळगाव : प्लास्टिक युनिट उद्योगांसाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लास्टीक युनिटसला पुनर्वापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र देण्याचा, पॉवर लुमला सबसिडी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात प्लास्टिक उद्योगांसाठी – कॉमन ईटीपी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असत्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.एमआयडीसीतील तीन प्लॉस्टिक उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जळगाव जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. प्लॉस्टिकचा पुर्नवापर या विषयावर चर्चा केली. ओडीओपी अंतर्गत प्लॉस्टिक उद्योगाला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्लॉस्टिक उद्योगात जळगाव मॉडेल तयार करणे जे प्लास्टिक कचऱ्याचे निमलन करेल व जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देईल. जळगावमध्ये जवळपास ४०० प्लॉस्टिक रिसायकलिंग युनिट्स आहेत.या युनिट्समध्ये उद्योगांच्या मगण्या पूर्ण करण्याची क्षमता आहे. यात परवडणाऱ्या दरात ईपीआर अनुपालनाची पूर्तता, पॅकेजिंग उत्पादने तसेच नॉन-पॅकेजिंग उत्पादनांमध्ये वापर करण्यायोग्य प्लॉस्टिकची निर्मिती करणे, विशेषतः चटई, बादल्या इत्यादीसारख्या ग्राहक उद्योगात आवश्यक असलेल्या उत्पादनांसाठी रीसायकलिंग युनिट्स स्थापित करणे, सरकारी परवाने सुरक्षित करणे, तंत्रज्ञान, वॉशिंग, यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करणे जेणेकरून उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जातील.

भागधारकाच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, सदस्यांना बोर्डिंग करून सक्रिय सहभाग घेतला जाईल. संपूर्ण उद्योगाच्या ऑन बोर्डिंगसाठी सीएम आयए, एमएएसएसआयए सारख्या इतर उद्योग संस्थांशी समन्वय, रिसायकलिंग युनिट्सना परवाने देण्यासाठी एम पीसीबी आणि इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधणे. एमपीएमएच्या मदतीने वर्तुळाकार इकॉनॉमी क्लस्टरच्या यशोगाथेसह जळगाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवू शकते जिथे ७५ हजार अधिक एमटी प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्लॉस्टिक पुनर्वापर करणाऱ्यांसाठी जागरुकता सत्र आयोजित केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.