कोलकाता : आर जी कर महाविद्यालयात पीडितेवर झालेल्या बलात्कारा प्रकरणी दिल्लीतील निर्भयाची आई आशा देवीने प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे निर्भयाच्या आईचे म्हणणे आहे. ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी आर्त मागणी निर्भयाच्या आईने केली आहे.
निर्भयाची आई आशादेवी यांनी ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागितला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, आरोपींवर कारवाई न करता जनतेची दिशाभूल करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात येत आहे. ममता बॅनर्जी एक महिला आहेत. त्यामुळे त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याबाबत निर्णय घ्यावा. याप्रकरणात पं. बंगालमधील लोकांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्या केवळ मुख्यमंत्री नाहीतर त्या गृहमंत्री, संरक्षणमंत्री आहेत, असे असताना अशा घटना घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यानंतर पुढे निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, वैद्यकीय महाविद्यालयात अशा घटना घडत आहेत. याचा अर्थ महिला सुरक्षित नाहीत. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, कोलकाता पोलिसांनी केवळ एकाला अटक केली होती. तसेच याआधी झालेल्या दिल्लीतील निर्भया प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. तशीच परिस्थिती आजही आहे. याप्रकरणाला ५ दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही ठोस पाऊल उचलता आले नाही. मध्यरात्री गुंडांनी रूग्णालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली, त्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले असून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याची खंत व्यक्त केली आहे
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारी रुग्णालयात अनेकदा डॉक्टरांना मारहाण केली जाते, अशा परिस्थितीत पुरुष डॉक्टरांचाही मृत्यू होऊ शकतो, अशी त्यांनी चिंता व्यक्त करत ममता बॅनर्जींना राजीनामा देण्याची मागणी केली आहे.