IRCTC ने चार धाम यात्रेसाठी खास टूर पॅकेज आणले आहे. जर तुम्ही चार धामला जाण्याचा विचार करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. याद्वारे तुम्ही देशातील अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता.
हे पॅकेज दिल्लीहून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने सुरू होईल. यामध्ये तुम्हाला दिल्लीहून ऋषिकेशला जाण्याची संधी मिळेल. यानंतर जोशीमठहून केदारनाथ, बद्रीनाथला जाण्याची संधी मिळेल.त्यानंतर ऋषिकेशहून परत आल्यानंतर तुम्हाला वाराणसी, पुरी, रामेश्वरम, पुणे, नाशिक, द्वारका आणि नंतर दिल्लीला ट्रेनने जाण्याची संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्हाला दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगरमध्ये बोर्डिंग मिळेल. तर राजकोट, विरंगम, पालनपूर जंक्शन, अजमेर आणि रेवाडी येथे डी-बोर्डिंग सुविधा उपलब्ध असेल.हे संपूर्ण पॅकेज 17 दिवस आणि 16 रात्रीचे आहे. यामध्ये एसी हॉटेलमध्ये राहण्यासोबतच तुम्हाला एसी 1 कूप, एसी 1 टायर, एसी 2 टायर आणि एसी 3 टायरमध्ये प्रवास करण्याची संधी मिळत आहे. पॅकेजमध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे.
संपूर्ण टूर दरम्यान IRCTC टूर मॅनेजर उपस्थित राहतील. याशिवाय ट्रेनमध्ये तुम्हाला सुरक्षा मिळेल. या पॅकेजचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 83,970 ते 1.79 लाख रुपये द्यावे लागतील. 28 जून 2024 पासून तुम्ही या पॅकेजचा आनंद घेऊ शकता.