फडणवीसांचं ‘ते’ वक्त्यव्य अन…अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची बीजं २०२२ मध्ये

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी काँगेसला सोडचिट्ठी दिली आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाणांचा राजीनामा धक्कादायक मानला जात असला तरी त्याचे संकेत जवळपास वर्षभर आधीपासूनच मिळत होते. अशोक चव्हाण ते बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहचले होते. तेव्हापासूनच अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

पक्षविरोधी कार्यवाही केल्या प्रकरणी काँग्रेसने त्यावेळी अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचबरोबर अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाही २०२२ मध्येच काँग्रेसच्या गटात सुरू झाल्या होत्या. पण या चर्चांना काही महत्त्व नाही, मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली होती.

२०२२ मध्ये बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण सभागृहात उशिरा पोहचले होते. त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नव्हतं. त्यांच्यासोबत इतर चार ते पाच आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. त्यानंतर “आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे आभार” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले होते