फर्दापुर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु, पर्यायी रस्ता उपलब्ध

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छात्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील  क्र. ७५३   एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठ्या  पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेला असून हा पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे. हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला असून पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

हा पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला आहे.  या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हानी  होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.  यामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार  १६ जूनपासून पुलाची दुरुस्ती होईपर्यंत बंद करण्यात येत आहे.

पर्यायी बदल

पर्याय क्र.  १- जड वाहतुक – नेरी एरंडोल- चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर

पर्याय क्र. २ – हलकी वाहतुक – फर्दापुर – तोंडापुर – मांडवा – वाकडी- शहापुर- जामनेर – नेरी

असा बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांनी कळविले आहे.