फाळणीच्या जखमांची व्यथा

लिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, रख अमेरिकतेही त्यांनी हिंदूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी एफबीआप, न्याय विभाग आणि कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीच्या स्थानिक पोलिसांसोबत बैठक घेऊन खलिस्तानी दहशतवादी भारतावर हत्ता करण्पासाठी अमेरिकेच्या भूमीचा वापर करीत असत्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ही अतिशय चिंतेची बाब असून, दहशतवाद्यांना वेळीच वेसन घातले नाही, तर भविष्यामध्ये डोकेदुखी अधिक वाढू शकते, अमेरिकेमध्ये मंदिरावरील हल्यांमध्ये अचानक वाढ झाली असून, उघडपणे तेथे राहणान्पा हिंदूंना धमकावण्याच्या प्रकारामध्येही वाढ झाली आहे.

गुरपलवंतसिंह पन्नूने स्थापन केलेली खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचे समर्थक अमेरिकेतील हिंदुत्ववादी तसेच भारतविरोधी कारवायांमध्ये सर्वाधिक सहभागी असल्याने पन्नूने वारंवार केलेल्या प्रक्षोभक आणि धमकीवजा भाषणांवर कारवाईची मागणी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनी केली आहे. मात्र, लोकशाहीसाठी बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्या अमेरिकन प्रशासनाने याबाबत अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. लोकशाहीचे गळे घोटणारे खलिस्तानी समर्थक अमेरिकेच्या भूमीवा सर्रास वापर करीत असूनही तेथील एफबीआय सरळ आपल्या कानावर हात ठेवीत काहीच माहीत नसल्पाचे म्हणत आहे. अमेरिकेचे हे दटप्पी धोरण संपूर्ण जग ओळखून आहे. दुसन्या देशाच्या कारभारामध्ये नाक खुपसून मानवाधिकाराचा राग आळवणारी अमेरिका या विषयावर मूग गिळून गप्प आहे.

अमेरिकेमध्ये खलिस्तान समर्थक उघडपणे एअर इंडियाची विमाने उडविण्याची धमकी देत आहेत. हिंदना लक्ष्य करणारे बॅनर घेऊन खलिस्तानी अमेरिकमध्ये उजळ माध्याने फिरत आहेत. तरीही अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय काहीच माहीत नसल्याचे उघड उघड खोट बोलत आहे. अमेरिकेचे हे धादांत खोटे बोलने भविष्यामध्ये त्यांच्याच अंगलट येऊ शकते. परंतु, तोपर्यंत बरीच वेळ निघून गेलेली असेल. अमेरिका हा एक पक्का स्वार्थी देश असून, आपला फायदा बघूनच त्याची रणनीती तयार होत असते. स्वार्धाशिवाय हा देश कोणाला साधी भीकही घालत नाही, हा इतिहास आहे. आपला स्वार्थ असेपर्यंत त्याने पाकिस्तानला पोसले. अब्जो रुपपांची खैरात वाटून पाकिस्तानता जगामध्ये उघड पाठिंबा दिला. दहशतवाद्याचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान संपूर्ण जगाला माहीत आहे. काश्मीरमधील खुनी तांडव हे पाकिस्तानचेच प्रायोजकत्व.

हे सर्व माहीत असूनही अमेरिकेने कधीच त्यास वेसन घालण्याचा प्रपत्न केला नाही. उलट अमेरिकेच्या पैशावर मस्तवाल झालेला पाकिस्तान काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येसाठी दहशतवाद्यांची खेप पाठविण्यास सदैव तत्पर असतो. पा बाबीस जेवढी अमेरिका जबाबदार आहे. तेवढेच येथील २०१४ पूर्वीचे केंद्र सरकारही आहे. मतांच्या राजकारणामध्ये त्यांना भारतीय नागरिकांच्या जीवाचे मोल कवडी एवढेही वाटले नाही. खलिस्तानचे उभे राहलेले हे भूत उभे राहण्यास भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी कारणीभूत असल्याचे मानते जाते. त्यावेळी स्वतंत्र भारताची फाळणी न होता अखंड भारत अस्तित्वात आला असता तर कदाचित आज खलिस्तानचा प्रश्नच उ‌द्भवता नसता दोन्ही देशांच्या पंजाब प्रदेशात शीख समुदायाचे वास्तव्य होते. फाळणीमुळे शिखांच्या पारंपरिक जमिनी पाकिस्तानमध्ये गेल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वीकारलेली देशाची फाळणी या देशाला एक भळभळती जखम देऊन गेली. या देशावर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या कॉंग्रेसला आपल्या मातृभूमीचे मोल कधीच कळले नाही. काँग्रेसची घराणेशाही या देशाला रसातळाला घेऊन गेली. दहशतवादाशी दोन हात करण्याऐवजी त्यास कुरवाळून आपली खुर्ची सांभाळण्यात कॉग्रेसने धन्यता मानती. त्याची फळे आजही आपण चाखत आहोत. या मातृभूमीशी प्रतारणा करणारी काँग्रेसही त्याची फळे चाखत आहे. परंतु, २०१४ साली उदयास आलेला जाज्वल्प देशभक्तीचा हुंकार एका नव्या भारताची नवी पहाट घेऊन आला आहे.