फुकट्या रेल्वे प्रवाशांविरोधात मोहिम: इतक्या लाखांचा दंड वसूल

भुसावळ :  रेल्वेला वाढलेल्या गर्दीचा फायदा काही फुकटे प्रवासी घेत असल्याने अशांविरोधात रेल्वे प्रशासनाने धडक मोहिम सुरू केली आहे. पाच हजार 952 प्रवाशांकडून एकाच दिवसात 50.84 लाख दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागाचे 537 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी गुरुवार, 9 रोजी भुसावळ विभागामध्ये तिकीट तपासणी मोहिम राबवली.

कारवाईने प्रवाशांमध्ये घबराट

या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवासाच्या पाच हजार 952 प्रकरणांतून एका दिवसात 50.84 लाख दंड वसूल करण्यात आला.  सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, भुसावळ विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी  मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी, भुसावळ विभाग रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.