फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीच विनयभंग

भुसावळ:  शहरातील एका भागातील तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या भावी पतीसह कुटूंबाला देवून तरुणीची बदनामी करण्यात आली तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या त्रिकुटाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 20 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, तिचे शहरातील तरुणासोबत प्रेम संबंध होते, मात्र तरुणीचे लग्न ठरल्यानंतर संशयित तरुणासह त्याच्या मित्राने तरुणीच्या भावी पतीला जावून तरुणीच्या असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली.

तसेच तरुणीसह तिच्या प्रियकराचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही देत तिचा पाठलाग केला. संशयित रीतेश मोरे, विशाल उर्फ चिंक्या निवृत्त सपकाळे  व पंकज गोविंद सोनवणे यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक उपनिरीक्षक  इकबाल अली सैय्यद करीत आहेत.