RBI: बँकांचे कर्ज भरावेच लागणार; माफी मिळणार नाही

मुंबई:  काही माध्यमांतून कर्जमाफी करून देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. कायदेशीर शुल्क भरून घेऊन कर्जमाफीची प्रक्रिया करून देऊ, असे दावे या जाहिरातीतून केले जातात. अशा जाहिराती पूर्णपणे फसव्या असून, बँकांचे कर्ज कोणत्याही स्थितीत भरावे लागणार आहे, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला.कर्जदात्यांनी अशा जाहिरातींनी भुलू नये, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. अशा संस्था किंवा व्यक्ती वृत्तपत्रांतून आणि समाज माध्यमांद्वारे कर्जमाफीच्या जाहिराती करीत आहेत.

सेवाशुल्क आणि कायदेशीर शुल्क भरून घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊ, असे दावे या केले जात आहेत. या संस्थांना असे कोणतेही अधिकार काही ठिकाणी असे दिसून आले आहे की, काही व्यक्तीही अशा प्रकारच्या जाहिराती करीत आहेत. यामुळे कर्जवसुलीसाठी बँका करीत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. बँका आणि वित्तसंस्था यांची देणी परतफेड नाही केली तरी चालतात, असा समज या जाहिरातीतून करून दिला जात आहे. याचा अंतिमतः फटका ठेवीदारांना बसतो, असे आरबीआयने आहे.