बँक निफ्टीत कमालीची वाढ, बाजारातील व्यवहार तेजीसह बंद

शेअर बाजार: अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून दिवसाच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात देशांतर्गत मार्केट दबावाखाली व्यवहार करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह तर बँकिंग, आयटी आणि वित्तीय शेअरवर सर्वाधिक दबाव दिसून येत होता पण दुपारच्या सत्रात सर्वांगीण रिकव्हरी दिसून आली. आणि बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले.

आज बँक निफ्टीने खालच्या स्तरावरून सुमारे 1000 अंकांची झेप घेतली आहे. आज सकाळी त्याने 45000 ची महत्त्वाची पातळी तोडली होती आणि 600 अंक गमावले होते, परंतु बंद होईपर्यंत त्यात 400 अंकांची उसळी दिसून आली आणि तो 46000 च्या पातळीवर बंद झाला.

बाजार बंद होताना BSE सेन्सेक्स 277.98 अंकांच्या वाढीसह 71,833 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 96.80 अंक वाढीसह 21,840 च्या पातळीवर बंद झाला.