बजाज ऑटोतर्फे बहुप्रतीक्षित पल्सर एनएस ४०० झेड लाँच

पुणे: ऑटो जगतातील प्रख्यात बजाज कंपनीने आपल्या पल्सर ताफ्यातील अत्यंत बहुप्रतीक्षित अशी पल्सर एनएस ४०० झेड मोटारसायकल लाँच केली. पल्सर बॅण्डने भारतात स्पोर्ट्स मोटारसायकलिंग हे सेगमेंट तयार केले असून, २००१ पासून ते या क्षेत्रात आघाडीवर आहेत. या प्रकारच्या चाहत्यांसाठी त्यांच्यातर्फे आता एक वैशिष्ट्यपूर्ण स्पोर्टी डिझाईन आणि परफॉरमन्स उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पल्सर एनएस ही संपूर्ण सीरिज एनएस श्रेणीच्या माध्यम ातून (एनएस १२५, एनएस १६० आणि एनएस २००) उत्तरोत्तर प्रगती करीत गेली आहे. मार्च २०२३ मध्ये या बाईकचा रोमांचक रिबूट करण्यात आला असून, या बाईकला नवीन एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली. आहे. पल्सर एनएस ४०० झेड बाईकच्या लाँचसह बजाज ऑटोने पल्सर श्रेणीतील ‘फ्लॅगशिप बाईक’ सादर केली आहे. पल्सर एनएस ४०० झेडमध्ये एनएस डीएनएचे डायनॅमिझम व मस्क्युरॅलिटी आहे आणि याला फ्लोटिंग पॅनलची जोड देण्यात आली आहे. आतापर्यंतची सर्वांत स्टायलिश पल्सर आहे. एनएस ४०० झेड ही सर्वांत मोठी पल्सर असून, इंजिनची क्षमता ३७३.२७ सीसी आहे.

पल्सर एनएस ४०० झेड च्या अॅडव्हान्स्ड राईड मोड्स मुळे राईडरची क्षमता वाढते. अॅडव्हान्स्ड ४३ एमएम यूएसडी फोर्क्स आणि स्मार्ट फोर वे स्विचसह राईड बाय वायर तंत्रज्ञाना मुळे अत्युच्च परफॉरमन्स आणि कंट्रोल प्राप्त होतो.डीआरएल असलेल्या एलईडी प्रोजेक्टमुळे अप्रतिम दृश्यमानता प्राप्त होते. सोबतच एलईडी टेललाईट्स, ब्लिंकर्स आणि हझार्ड लाईट्सही देण्यात आले आहेत. ही बाईक ग्लॉसी रेसिंग रेड, ब्रूकलिन ब्लॅक, पर्ल मेटॅलिक व्हाईट आणि प्यूटर ग्रे या रंगात उपलब्ध आहे.