बदल करून एकदा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला संघी द्या : करण पाटील

जळगाव : महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहात परंतु या ठिकाणी आमच्या जळगावची निवडणूक अतिशय वेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी केलेली आहे असत्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी संघर्ष करत असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांनी केले.

ते  पुढे म्हणाले की, अतिशय कमी वयामध्ये आपल्याकडं आम्हाला उमेदवारी मिळाली. एक मैत्रीचा प्रतीक आज या ठिकाणी गद्दारी धोकादारी पाठीत खंजीर खुपसले. त्या ठिकाणी एक मैत्रीचा उदाहरण खासदार उन्मेश दादांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभा केला.  आम्ही आपला आशीर्वाद घेऊन संघर्ष करायला निघालोय योग्य माणसाचा आशीर्वाद घेऊन आम्ही संघर्ष करायला निघालोय.  कारण आपण जो संघर्ष करत आहात.  आपण जी मान महाराष्ट्राची वाकू देत नाहीयेत.  आपण जो संघर्ष करत आहात आपण जे वेदनासहन करत आहात.  अतिशय तळमळीने फिरणारा आपला हा कार्यकर्ता या शिवसेनेचा कार्यकर्ता तळागाळात गावागावांमध्ये आपण मोठ्या तक्तांपुढे झूकले नाही तसे ते देखील या ठिकाणी मोठ्या तक्तांकडे झुकत नाहीयेत हा आपल्याला मानणारा शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जवळून बघतोय.

सुरुवातीला आमच्या मतदारसंघात सांगितलं गेलं होतं की पाच लाख मतांनी भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी निवडणूक जिंकून येतील.  दहा-बारा दिवस झाले आता ते पाच लाखच नाव सुद्धा काढत नाही. समोरच्याकडे सत्ता आहे मोठी लोक आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जास्त आहेत.  ते विजयाच्या गप्पा मारू शकतात त्यांना गर्व झालेला आहे.  परंतु, आपला विजय हा जनतेच्या हातात त्या ठिकाणी आहे  जनतेला ठरू द्या म्हणून आम्ही विजयाच्या गप्पा या ठिकाणी मारत नाही.  या ठिकाणी समोरून सत्ताधारी असल्यामुळे अनेक मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होतो.  वैयक्तिक टीका माझ्यावर केली जाते.  आपली संस्कृती जपत माझ्यासमोर एक महिला उमेदवार असल्यामुळे आम्ही आजपर्यंत त्यांच्यावर कुठेही टीका केली नाही. आता जनता आणि दहा वर्षे बघितले आमच्या जळगावकरांनी दहा वर्षे बघितले की सोशल मीडियाचा वापर फक्त गैरवापरासाठी आणि लोकांचे टाळकी भडकवण्यासाठी या ठिकाणी केले जातात. आम्ही आवाहन करतोय की पहिल्यांदा एक तरुण उमेदवारी या मतदारसंघातून उभा आहे.  आपली मशाल पहिल्यांदा कुठली निवडणूक लढवते,  सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा येत असताना आम्ही लोकांना विनंती केली की एकदा बदल अनेक वर्ष आपण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला देऊन बघितले एकदा थोडंसं चव बदलून बघावी.  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आपण एकदा संधी या ठिकाणी द्यायचे अनेक वर्ष तीस वर्षे झाले का ती सत्ता आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी देतोय परंतु एकदा आता बदल करून शिवसेना पण काय आपली मशाल या ठिकाणी शोधायला सोपं जाणारे मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांना ऐकायचे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो.