बद्धकोष्ठता आणि अपचनापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ 5 पैकी करा कोणतीही एक उपाय

आजकाल बाहेर खाण्याचा ट्रेंड झपाट्याने सुरू आहे. लोकांना जंक फूड्स खूप आवडतात. बाहेरचे अन्न सतत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या वाढत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोट साफ होत नाही. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी बाजारात अनेक पावडर आणि औषधे आहेत परंतु त्यापैकी बरीच प्रभावी नाहीत. अशा परिस्थितीत बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पुढील घरघुती उपाय करू शकता.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी 5 घरगुती उपाय

1. दूध-लसूण
रात्री झोपण्यापूर्वी लसूण मिसळून दूध प्यायल्यास बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम मिळतो. यामुळे अपचनाची समस्याही दूर होते आणि लवकरच आराम मिळतो. त्यामुळे लवंग आणि लसूण खूप फायदेशीर मानले जाते.

2. दूध-हिंग
बद्धकोष्ठता आणि अपचनापासून सुटका मिळवण्यासाठी दुधात हिंग मिसळून पिणे फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात थोडी हिंग मिसळून प्यायल्याने सकाळपर्यंत बराच आराम मिळतो.

3. दूध-खजूर
जर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही दूध आणि खजूरचे सेवन करू शकता. यामुळे पोटाचे आरोग्य लवकर सुधारू शकते. खजूरमध्ये आढळणारे फायबर पोट आणि पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

4. दूध-गूळ
बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या लवकर दूर करण्यासाठी दूध आणि गूळ खूप उपयुक्त आहे. गूळ मिसळून दूध प्यायल्याने पोट साफ राहते.

5. दूध-हळद
हळद खूप फायदेशीर मानली जाते. त्यात प्रतिजैविकांचे प्रमाण जास्त असते. स्वयंपाकघरात चव वाढवणारी हळद, रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.

टीप : वरील दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.