जामनेर : बस चालकांची मनमानी थांबत नाही, प्रवासी किती तरी वेळा पर्यंत थांबुन देखाली बस वेळे वरती येत नाही. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होता आहे. पण कोणीही अजून देखाली कारवाई करत नाही आहे. अश्यातच एक घटना समोर आली आहे, जळगाव ते जामनेर एसटीने परत येत असताना चालकाने पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वेग कमी न करता भरधाव बस नेल्याने गाडीत बसलेली महिला सीटवरून खाली पडून जखमी झाली. हा अपघात केकतनिंभोरा चिंचखेडेदरम्यान घडला. पण या अपघाताच्या वेळेस या महिलेची कोणीही मदत केली नाही, व चालक वाहकाने तिला बसस्थानकावर उतरवल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी महिला सीटवरून खाली पडून जखमी झाली. यानंतर जामनेर बसस्थानकावर चालक व वाहक यांनी महिलेस बसमधून खाली उतरवून दिले. रुग्णालयात न नेता रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चालकाने वेग कमी करणे आवश्यक होते; मात्र वेग कमी न स्टँडवरच सोडून दिल्याची तक्रार महिलेच्या मुलाने जामनेर पोलिसांकडे दिली आहे. प्रवासी महिलेने ही माहिती नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेच्या मणक्यास मार लागला. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.