तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे येरकौड घाट रोडवर एका खासगी बसचे नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. बस 11 व्या हेअरपिन वळणावरून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सुमारे ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये ५६ प्रवासी होते, जे येरकौडहून सेलमला जात होते.
#WATCH तमिलनाडु: यरकौड, सेलम में एक बस के खाई में गिरने से 5 लोगों की मौत हो गई है। घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया है। रेस्क्यू ऑपरेशन जारी है। (30/04) pic.twitter.com/fZ1QaqQUfr
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2024
पोलिसांनी सांगितले की, जखमी प्रवाशांनी सांगितले की, बस 11 व्या हेअरपिन वळणावरून जात असताना तिचा वेग खूप होता, त्यामुळे ती बाजूच्या भिंतीला धडकली आणि नियंत्रणाबाहेर जाऊन दरीत कोसळली.
पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये बहुतांश मजूर होते, जे बांधकाम आटोपून घरी परतत होते. रस्त्याने जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.