---Advertisement---

बहाण्याने बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

जळगाव : सोळा वर्षीय मुलीस माझ्या पत्नीने तुला घरी वरच्या मजल्यावर बोलविल्याचा बहाणा करीत तिच्यावर जबरीने अत्याचार केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार, 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मुलगी तिच्या घरी असताना संशयित घरी आला. माझ्या पत्नीने वरच्या मजल्यावरील घरी तुला बोलविले,असा त्याने निरोप दिला. कामानिमित्त बोलविले असल्याचे समजून ही मुलगी दुसऱ्या मजल्यावरील घरी गेली असता संशयिताने मुलीचे तोंड दाबत आतुन कडी लावून दरवाजा बंद केला.

त्यानंतर त्याने जबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पिडितेने आपबिती कुटुंबात सांगितली. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी संशयित योगेश तेजमल पवार याच्या विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि ए. सी. मनोरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पिडितेकडून माहिती जाणून घेतली. गुन्ह्याचा तपास सपोनि ए. सी. मनोरे करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---