तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. अशातच जालन्यामधून एक अपघाताची बातमी समोर येतेय. बहिणीला भेटायला दुचाकी वरून जाणाऱ्या तीन मित्रांचा बसच्या जोरदार धडकेत अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अंबड येथील अरबाज महम्मद पठाण हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी भोकरदन येथे निघाला होता. सोबत त्याचे मित्रही होते. ते तिघेही एकाच दुचाकीवरून भोकरदन येथे बहिणीच्या भेटीला निघाले होते. भोकरदन-जालना महामार्गावरील केदारखेडाजवळील जवखेडा फाट्यावर भोकरदनहुन जालण्याकडे जाणाऱ्या सिल्लोड-अंबड बस क्रमांक एम.एच.०६ एस. ८५४६ ला या तिघांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.१३ डि.ए. ४३०६ ने समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अबुजर शाह हा जागेवरच ठार झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी अजहर अली शहा व अरबाज महम्मद पठाण या दोघांना उचलुन भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे दोघांवर उपचार करून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, दुचाकीवरील तरुणांनी दुचाकी अचानक वळवली. त्यांना वाचविण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या खाली घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर बस चालक आर. एस. राठोड यांनी स्वतः भोकरदन ठाण्यात हजर होऊन अपघाताबाबत माहिती दिली.भोकरदन पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा पूर्ण केला.