बांगलादेशातील शेख हसीनांची सत्ता उध्वस्त करण्यामागे नेमकं कोण? – वाचा सविस्तर

ढाका : बांगलादेशात हसीना शेख यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारत देशात जाण्याचा निर्णय घेतला. शेख हसीना याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी भारतात आल्या होत्या. मात्र आता भारतात येण्याचे कारण काहीसे वेगळे होते. शेख हसीना यांनी राजीनामा देण्यामागे बांगलादेशचे तीन विद्यार्थी कारणीभूत आहेत असे बोलले जात आहे.

नाहिद इस्लाम
नाहिद इस्लाम हा विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा आहे. त्यांनी रविवारी एक वक्तव्य केले होते. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. तो म्हणाला की, “आज आम्ही काठ्या उचलल्या आहेत. काठी-लाठी चालली नाहीतर आम्ही हत्यारे घ्यायला कोणतीही कसर सोडणार नाही. पंतप्रधान हसीना यांना देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची आहे. यावर आता शेख हसीनांनी पंतप्रधावरून पायउतार होतील की, रक्तपाताचा अवलंब करतील,” असं नाहिद इस्लाम म्हणाला होता.

नाहिद हा ढाका विद्यापिठाचा विद्यार्थी आहे. २० जुलै रोजी पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले होते असा आरोप नाहिदने केला. मात्र नाहिदने केलेला आरोप पोलिसांनी धुडकावून लावला. दरम्यान नाहिदला काही लोकं एका कारमध्ये घेऊन चालले आहेत असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला होता. तसेच त्यानंतर नाहिद बेपत्ता झाला मात्र, २४ तासांनंतर नाहिद हा एका पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

त्याला बेशुद्ध होईपर्यंत गजाने मारण्यात आले होते असा दावा करण्यात आला. २६ जुलैला पोलिसांनी उपचारादरम्यान सुरक्षेचे कारण देऊन त्याला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्याची मागणी डिटेक्टीव्ह ब्रँचने केली. त्यानंतर नाहिदने एका वृत्तपत्राला सांगितले की, २० जुलै रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारे २५ ते ३० लोकांनी त्याला न सांगता पुन्हा घेऊन गेले. त्यावेळी नाहिदला मारहाण करण्यात आली. त्यावेळी आंदोलकांनी तीव्र आंदोलन केले.

आसिफ महमूद
ढाका विद्यापीठात भाषा कौशल्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आसिफ महमूदला देखील २६ जुलै रोजी डिटेक्टिव ब्रँचने ताब्यात घेतले होते. त्याला सुरक्षेचे कारण देत नाहिदप्रमाणे ताब्यात घेतले. त्यानंतर २७ जुलै रोजी डिटेक्टिव्ह ब्रँचने आणखी दोन विद्यार्थी सरजिस आलम आणि हसनत अब्दुल्ला यांना ताब्यात घेतले. २८ जुलै रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला भेटण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्याला भेटू दिले गेले नाही.

पालकांना २९ जुलै रोजी भेटण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु नाहिद, आसिफ आणि त्यांच्या सहकार्यानी एक व्हिडीओ जारी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण करून व्हिडीओ बनवला होता. आसिफला इंजेक्शन देण्यात आले त्यामुळे तो अनेक दिवस बेशुद्ध होता. दरम्यान याप्रकरणात विद्यार्थ्यांच्या अटकेला विरोध केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी त्यांची कोठडीतून सुटका करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना ३ ऑगस्ट रोजी आसिफने फेसबुकवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना घरी न राहण्याचे आवाहन केले होते.

अबू बखर मुजुमदार
शेख हसीना यांना राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या तिघांपैकी एक अबू बखर मुजुमदार या विद्यार्थ्याचा समावेश आहे. अबू बखर हा बांगलादेशातील ढाका विद्यापीठातील भूगोल विभागाचा विद्यार्थी आहे. तो नागरी हक्क आणि मानवी हक्कांसाठी काम करतो. ५ जून रोजी उच्च न्यायालायाने आरक्षणाचा निर्णय दिल्यानंतर बकर याने आंदोलन छेडले होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना दिलेल्या आरक्षणाविरोधात भूमिका घेतली होती. १९ जुलै रोजी काही जाणांनी अबूला धानमंडी परिसरातून आपल्यासोबत नेले होते. दोन दिवस त्याच्याबाबत कोणतीही एक माहिती मिळाली नाही. त्य़ाला ज्याठिकाणाहून ताब्यात घेतले गेले, त्याच ठिकाणी त्याला पुन्हा सोडण्यात आले होते. त्यानंतर अबूने प्रसारमाध्यमांना सांगितले की, पोलिसांना मला आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते. याबाबतीत नकार दिल्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्याला धामंडी येथील नजीकच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्याला पुन्हा एका २६ जुलै रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्याला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात आले असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे.