बांगलादेशात झालेल्या हिंसाचारामुळे पाकिस्तानातील हिंदूंनी घेतला मोठा निर्णय!

अमृतसर  :   पाकिस्तानात आजही अनेक हिंदू नागरिक आहेत. सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुष आन्याय आत्याचार सुरू आहे. याचेच पडसाद पाकिस्तानात दिसू लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानातील काही हिंदू कुटुंब वाघा बॉर्डरवरून भारतातील पंजाब येथील अमृतसर येथे ७ ऑगस्ट रोजी आले आहेत.

पाकिस्तानातील हिंदूंवर केलेल्या अन्याय आत्याचाराच्या घटना नवीन नाहीत मात्र,पाकिस्तानातील हिंदू आपल्या बचावासाठी भारतात येत आहेत. यामध्ये २१ जणांचा समावेश आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंच्या हिंसेच्या भीतीने एका कुटुंबातील २१ नातेवाईक भारतात आले आहेत. ते अमृतसरहून जोधपूर येथे जाणार आहेत.

भारतात पलायन केलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी पुन्हा पाकिस्तानात जाणार नाही असे सांगितले. बांगलादेशात हिंदूंवर हिंसा सुरू आहे त्या भीतीने काही पाकिस्तानी हिंदू भारतात आले आहेत. त्यांना पाकिस्तानात असुरक्षितता वाटते अशी भावना त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे व्यक्त केली.

वाघा बॉर्डरवरून अनेक हिंदू कुटुंब भारतात येऊ शकतात असे सांगितले. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील हिंसाचारामुळे पाकिस्तानातील अनेक हिंदू भारतात येणार असल्याची शक्यता आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमाने दिली आहे.

बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचारच नाहीतर पाकिस्तानातील हिंदू भारतात येण्याची अनेक कारणे आहेत. जसे की याआधी अनेकदा पाकिस्तानी कट्टरपंथींनी हिंदूंना टार्गेट केले होते. हिंदू महिलांवर अन्याय आत्याचार, बलात्कार केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. हिंदू महिलांना जबरदस्ती धर्मांतरण करण्यास भाग पाडण्यात आले होते. यामुळे वेळेनुसार पाकिस्तानातील हिंदूंचे भारतात अनेकदा पलायन झाले आहे.