बांगलादेशात हिंदूंनाच केले टार्गेट! ४०० कट्टरपंथींनी केली हिंदूंची घरे उध्वस्त!

ढाका : बांगालदेशात अराजकतेच्या परिस्थितीत आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशी हिंदूंना टार्गेट (Hindu Target) केले जात आहे. तब्बल २४ हिंदूंना जाळण्यात आले होते. अशातच आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या नावाखाली ४०० कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरावर हल्लाबोल केला आहे. ही घटना बांगलादेशातील नारायणगंज येथे घडली आहे. तसेच यामध्ये बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांचे घर जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

नारायणपूर जिल्ह्यातील रघुनाथपूर येथील हिंदू रहिवाशांच्या घरावर हल्ला केला. यामुळे बांगलादेशात हिंदूंवर होत असलेली हिंसा ही चिंतेची बाब आहे. पीडित महिलेने प्रसारमाध्यमाशी बोलत असताना घडलेला सर्व प्रकार फोन कॉलच्या माध्यमातून सांगितला होता. यावेळी त्यांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली होती. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, याठिकाणी हिंदूंवर आत्याचार होत आहे. पोलीस यावर काहीच करत नससल्याचे पीडितांनी सांगितले आहे.

नारायणपूर जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण बांगलादेशात सोमवारपासून हिंदूवर हल्ले सुरू आहेत. शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर कट्टरपंथी संगठन जमात-ए-इस्लामी यांनी हिंदूंची घरे, दुकाने यांची यादी तयार केली आहे.

रात्रीपासून हिंदूंवर अन्याय आत्याचार होत असल्याचा दावा केला आहे. विश्वहिंदू महासंघ, बांगलादेश यांनी बांगलादेशात हिंदूवर सुरू असलेल्या हिंसकतेवर बोट ठेवले आहे. या यादित तीन हिंदू महिलांची नावे आहेत. ज्यामध्ये काही इस्लामी दंगेखोरांनी त्यांचे अपहरण केले आहे.

बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बांगलादेशी हिंदू भयभीत आहेत. सुरक्षेच्या कारणाअभावी ते आपले नाव सांगत नाहीत. जमात-ए-इस्लामी समूहाचे लोक रस्त्यावर बंदूक, हत्यारे घेऊन फिरत आहेत. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केली जात आहे. यामुळे पीडित महिला, बांगलादेशी हिंदूंना आपल्या नातवाईकांशी संवाद साधता येत नाही.

बांगलादेशी हिंदू गायकाच्या घराची जाळपोळ
दरम्यान, बांगलादेशी हिदू गायक राहुल आनंद यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात राहुल आनंद यांचे घर जाळण्यात आले आहे. राहुल आनंद यांचे घर गेली १४० वर्षे जुने आहे. तसेच राहुल आनंद यांच्या ३ हजार म्युझिकल इंस्ट्रूमेंट्सची तोडफोड झाली. राहूल आनंद यांचे मित्र सैफुल जनरल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितले की, आमच्या राहुल आनंदकडे ३ हजार वाद्ययंत्र होते. त्यांनी अनेक व वर्षांपासून हे वाद्य जपून ठेवले होते. मात्र आता ते जाळले गेले आहेत.