ढाका : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना सरकारच्या राजीनाम्यासाठी बांग्लादेशवासी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी निदर्शने केली आहेत. यामध्ये तब्बल १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात १९ पोलीस ठाण्यासह संबंधित २६ पोलिस दक्षता घेत आहेत. यामध्ये काही हिंदूंच्या मंदिरांवर आणि घरांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे हे प्रकरण चांगंलेच तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पोलिसांवर हल्ले करण्यात आले. त्यामध्ये चार जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक काम करत आहेत. त्यामध्ये मैमनसिंहमधील रेंज डीआयजीचे पोलीस प्रशासन आणि इतर दोन पोलीस चौकींचा समावेश आहे.
याचपार्श्वभूमीवर बांग्लादेश पोलिसांनी रविवारी या ठिकाणांवरील हल्ल्याची माहिती दिली. सिरागंजमधील इनायतपूर पोलीस ठाणे याठिकाणी भीषण हल्ला झाला. येथे १३ पोलिसांना बेदम मारहाण केली. यासंदर्भात इनायतपूरचे नागरिक पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आले आणि त्यांनी हल्ला केला. इनापयतपूर व्यतिरिक्त रविवारी ४ ऑगस्ट रोजी कोमिल्ला येथे देखील हल्ला झाला, या हल्ल्यात १४ पोलीस जागीच ठार झाले आहेत. यानिदर्शनादरम्यान बांग्लादेश येथे एकाच दिवसात तब्बल ३०० पोलिस जखमी असल्याचे आढळून आले आहे.
इस्कॉन टेंपल आणि हिंदूंच्या मंदिरांवर देखील हल्ला करण्यात आला. यामुळे वातावरण चिघळले आहे. हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यू लावावा लागला होता. तसेच सरकारी कामे देखील तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. यावेळी आंदोलनकांनी हवेत गोळ्या घातल्या. हसीना शेख यांच्या चुलत भावाच्या घराला आग लावण्यात आली. तसेच शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले.