तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। राज्याच्या विविध विभागातील रिक्त जागांच्या भरतीबाबत राज्य शासन निर्णय घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती जाहीर होऊन सहा महिने झाले तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकार वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध करत आहे. तलाठी, शिक्षक, आरोग्य विभागात मेगा भरती होत असून प्रक्रिया जलद गतीने होत आहे. कनिष्ठ अभियंत्यांची ५३२ व स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची एक हजार ३७१ पदे भरण्यासाठी बांधकाम विभागाने १३ एप्रिल २०२३ ला ‘टीसीएस’सोबत करार केला. यामध्ये पात्र परीक्षार्थींची २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा होऊन त्यांची निवड केली जाते.
या परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, भाषा, गणित आदी विषयांचे प्रश्न विचारले जातात. या विभागात २०१९ पासून भरती झालेली नाही. त्यात आता कुठे भरती जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.