बापाने मद्यधुंद होऊन मुला सोबत केले असे काही की…. वाचून तुम्हाला देखील बसेल धक्का

Crime News: मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये दारूच्या नशेत एका पित्याने आपल्या मुलाचा भोसकून खून केला. हत्येनंतर कुटुंबीय गुपचूप मृत मुलाचे अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते, त्यावेळी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे.उज्जैनमधून हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. येथे घरातील भांडणाच्या वेळी मद्यधुंद बापाने आपल्याच मुलावर चाकूने हल्ला केला. यानंतर कुटुंबीयांनी जखमी मुलाला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदन न करता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. मात्र, अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलिसांनी स्मशानभूमी गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी सांगितले की, मृत संजय आणि त्याचे वडील कैलास दोघेही दारू प्यायचे. रात्री अकराच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला आणि वडिलांनी घरातच भाजी कापण्याच्या चाकूने मुलाच्या पोटावर वार केले. चाकूने वार केल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडली, पण घरच्यांना कोणताही नवा वाद नको होता. यामुळेच त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी कुटुंबीयांनी क्लिनिकमध्ये नेले, मात्र तेथे त्यांना डॉक्टर सापडला नाही. यावेळी कुटुंबीयांनी मेडिकल स्टोअरमधून बँडेज विकत घेऊन स्वत: पट्टी बांधली.

जखमी संजय रात्रभर बेशुद्ध पडला. सकाळी त्याला उलट्या होऊ लागल्या. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथम त्याचा ईसीजी केला आणि चाचणीनंतर त्याला मृत घोषित केले. संजयच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना त्याचे पोस्टमॉर्टेम करून त्याचे प्रमाणपत्र बनवण्यास सांगितले, मात्र संजयचे वडील अडकतील असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी शवविच्छेदन न करता मृतदेह नेला.

गुपचूप अंत्यसंस्कार केले जात होते
संजयचा मृतदेह घेऊन कुटुंबीय घरी पोहोचले आणि वडिलांना वाचवण्यासाठी संजय जखमी अवस्थेत मरण पावल्याचे लोकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा अंत्यसंस्कार होणार होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि मयताचे कपडे जप्त केले आहेत. तसेच हत्येतील आरोपी वडील कैलास सोनी याचा शोध सुरू केला.

वडिलांना खुनाचा कोणताही पश्चाताप नाही
पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीय मृत संजयच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना त्याचे वडील कैलास दारूच्या नशेत घराबाहेर भटकत होते. कैलास म्हणत होता की त्याला (मृत मुलाला) लवकर घेऊन जा आणि त्याचे अंतिम संस्कार करा.