जळगाव : शहरात आज अनंत चतुर्थीनिमित्ताने श्री गणरायाला निरोप दिला जात आहे. जळगाव शहरातील गणेश मंडळे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या आहेत. या सर्व मंडळांचे केशवस्मृती सेवासंस्था समूहातर्फे भारत मातेची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी केशव स्मृती प्रतिष्ठान समन्वयक दिलीप चोपडा, जळगाव जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, निलकंठ गायकवाड, प्राचार्य अनिल राव, दै. तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी, विवेकानंद प्रतिष्ठानचे डॉ. रत्नाकर गोरे, ज्ञानेश्वर पाटील, डी. वाय. पाटील, दिनेश ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित आहेत.
जळगाव शहरातील विविध भागातील गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. श्रींच्या विसर्जन मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सजवलेल्या वाहनावर श्री गणरायाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात येत आहे. यावेळी काही शाळकरी मुला मुलींनी लेझीमवर ताल धरल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी टाळ मृदूंगाच्या गजरात सहभागी झालेले चिमुकलें गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. मिरवणूक खानदेश मिल कॉम्प्लेक्स मार्गाने टॉवर चौकाकडे मार्गस्थ झाल्या. मेहरूण तलावाकडे वाजत गाजत श्रींच्या विसर्जनासाठी रवाना होत आहेत.
दरम्यान, टॉवर चौकात केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या वतीने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भारत मातेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी केशव स्मृती प्रतिष्ठान समन्वयक दिलीप चोपडा, जळगाव जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, निलकंठ गायकवाड, प्राचार्य अनिल राव, दै. तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी, विवेकानंद प्रतिष्ठानचे डॉ. रत्नाकर गोरे, ज्ञानेश्वर पाटील, डी. वाय. पाटील, दिनेश ठाकरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित आहेत.
विसर्जन मिरवणुकींवर सीसीटीव्हींची नजर
जळगाव शहरात विसर्जन मार्गावर ८३ सीसीटीव्ही कॅमेरे व ५ ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. भुसावळ येथील जामा मशिद या परिसरात नगरपालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रावेर येथे मुख्य मिरवणुकीच्या मार्गात व तसेच संवेदनशील परिसातत पूर्वीपासूनच कॅमेरे लावण्यात आले आहेत.