बारवर दगडफेक करीत लुटले साडेचार लाख, जळगावमधील घटना

जळगाव : जिल्हा पेठ पोलिस ठाण्यासमोरील एका बियरबारमध्ये गोळी झाडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी बियरबारवर दगडफेक केली. तसेच गल्ल्यातून साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवार, १५ रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.

राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपा शेजारील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एन. एन. बियरबारमध्ये रविवारी रात्री तीन जण आले. त्यांनी मॅनेजरला पाच बियर फुकट मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

तेथे बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले. दोघांनी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून नेली.

राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपाशेजारील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एन. एन. बियरबारमध्ये रविवारी रात्री तीन जण आले. त्यांनी मॅनेजरला पाच बियर फुकट मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेथे बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले.

दरम्यान, तिघांनी बारमधील गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून नेली. यावेळी प्रचंड धावपळ झाली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली मात्र तोवर टोळक्याने हैदोस घालून फरार झाले होते.