मुंबई: बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार केला आहे. ही लढाई ऐतिहासिक असली तरी ती वैयक्तिक नाही. विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली असत्याचे आवाहन बारामतीकर जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बारामतीत परिवर्तन ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असत्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. ज्यांनाअजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी शरद पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो. पण, शरद पवार यांचे बोट सोडल्यावर मोदींनी देशाचा कायापालट केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आहे. शरद पवार यांचे बोट सोडले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. देशाला महासत्ता बनवण्याचे वचन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. आता देशात केवळ मोदी गॅरंटी चालते आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही, असे ते म्हणाले.वयाचे ५४ वर्षे उलटले तरी सुद्धा परिपक्वता येत नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड आ जनता येथे आली आहे, ही उपमुख्यमंत्री पव अजित पवारांच्या कामाची पोचपावती विभ
गट