राज्यात यावर्षी बालविवाहावर कारवाई सुरू झाल्यापासून माता मृत्यूचे प्रमाण ३३ टक्क्यांनी आणि बालमृत्यूमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मंगळवारी दिली.बालविवाह ही समाजाला लागलेली सामाजिक कीड असून, ती २०२६ पर्यंत नष्ट करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी ५ हजाराहून अधिक लोकांना आधीच अटक करण्यात आली आहे. बालविवाह हे एक सामाजिक दुष्कृत्य आहे,
जे उच्च अर्भक आणि मातामृत्यू दर यासारखे अनिष्ट आरोग्य परिणाम प्रकट करते, असेत्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले. आमच्या कारवाईने महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात उत्साहवर्धक परिणाम दिले आहेत.आसाममध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर जास्त आहे आणि ते इतरांच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. २०२० मध्ये ५ वर्षांखालील मृत्यूची आकडेवारी राष्ट्रीय सरासरी ३२ टक्क्यांच्या तुलनेत राज्यात ४० टक्के होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या धोक्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या काही उपाययोजनांबद्दल सरमा म्हणाले की, बालविवाहाच्या विरोधात अनेक टप्प्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करून ५,००० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. आसाम सरकारने ग्रामपंचायत सचिवांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. परिणामी, २०२१-२२ मधील का ७६६ वरून २०२२-२३ मध्ये ५१० पर्यंत माता मृत्यूच्या संख्येत ३३.४ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१-२२ मधील ७,८७२ वरून २०२२-२३ मध्ये ६.७१८ पर्यंत बालमृत्यूंची संख्या १४.७ टक्क्यांनी घसरली आहे.