बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले. बिहारमध्ये एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही पहिलीच भेट आहे. येत्या काळात बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्याच वेळी, 12 फेब्रुवारीला नवीन एनडीए सरकारची फ्लोर टेस्ट आहे. नितीशकुमार यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

अशा वेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. छायाचित्रात दोन्ही नेते प्रेमळ भेट घेत आहेत. सीएम नितीश यांनी पीएम मोदींना पुष्पगुच्छ अर्पण केला.