जळगाव : लोकसभा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी झटणाऱ्या बीएलओ यांना मानधनासह इतर समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या समस्या सोडविण्यात याव्यात यासंदर्भात बुधवार, १५ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्व बीएलओ व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वयक समिती सदस्य उपस्थित होते.
लोकसभेचे निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि जळगाव आणि रावेर लोकसभा या भागामध्ये लोकसभेचा मतदान पार पडलेला आहे. या कामांमध्ये लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून बीएलओ हा अधिकारी पूर्णपणे सक्रिय कामकाज करत सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी वारंवार जळगाव शहरांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना मीटिंगसाठी यावं लागत होत. मागील महिनाभरापासून रोज हे कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर मतदारापर्यंत निवडणुकीच काम केले आहे. परंतु, त्यांना अत्यंत्य तुटपुंजे मानधन देण्यात आल्याचा आरोप या बीएलओ यांनी केला आहे. निवडणुकीच्या वार्षिक कामाचे मानधन वाढवून मिळावे. (कारण वर्षभरतील मिटिंग व कागदपत्रे पोहचवणे साठी येण्या जाण्याचा खर्च, स्टेशनरी खर्च, online कामे खर्च व इ.). सर्व शासकीय कर्मचारी असल्यामुळे आठवड्यातील रविवार हा एकच सुटीचा दिवस असल्यामुळे रविवार वगळून कामे देण्यात यावी. वारंवार देण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या धमक्यांएवजी सकारात्मक व मानवी दृष्टीकोन ठेवून सहानुभूतीने व प्रेमाची वागणूक मिळावी जेणेकरून चांगल्या कामास प्रोत्साहन मिळेल. एकाच निवडणूकीत विविध ठिकाणच्या मानधनामध्ये तफावत आढळाळी. EDC न मिळाल्यामुळे काही BLO मतदानापासून वंचित राहीले. रावेर लोकसभा क्षेत्रातल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मलकापूर येथे बीएलओ यांना ८०० रुपये मानधन दिले जात असतांना बाकीच्या क्षेत्रामध्ये दीडशे रुपये मानधन दिले गेले. यासोबत शाळेतील स्काऊट गाईडचे विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून शासनाने मंजुरी दिली. परंतु, प्रत्यक्ष एकाच स्वयंसेवकाचे मानधन दिल्याने स्वतः च्या मानधनातून दुसऱ्या स्वयंसेवकास मानधन द्यावे लागले. सफाई कर्मचारी नसल्याने त्याचा खर्चही या बीएलओ यांना करावा लागला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधान सभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.