तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्याच्या बेलाड या गावात दारूचा व्यवसाय सुरू असल्याने हा दारुचा व्यवसाय बंद करावा यासाठी महिलांनी एल्गार पुकारला. यात महिलांनी थेट दुकानाची तोडफोड केली. या प्रकारणी दोन्ही बाजूंनी तक्रार दिल्यावर दोघांवरही गुन्हे दाखल झाले.
म्हणून थेट दुकानाची तोडफोड
दारूबंदीसाठी महिलांनी दोन महिन्यांपुर्वी जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभाग अधिकारी मलकापूर व ठाणेदार सर्वांना निवेदन दिले होते. परंतु, या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही. यामुळेच आजही गावात दारूबंदी विक्री जोरात सुरू होती. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य दिपमाला इंगळे व गावातील महिलांनी, दारूच्या दुकानात जाऊन नारेबाजी केली व दारु दुकानांचे नुकसान केले.
याप्रकारणी दोन्ही बाजूनी तक्रार दिल्यावर दोघांवरही गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी दारूबंदीसाठी रुद्रावतार दाखवलेल्या महिलेला अटक केली. यामुळे याचा निषेध म्हणून गावातील महिलानी पोलिस स्टेशन गाठत गावात दारुबंदी करण्याची मागणी केली.