BANGALORE EXPLOSION : बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. लागलेल्या आगीत किमान पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा कॅफे बेंगळुरूमधील सर्वात लोकप्रिय फूड जॉइंट्सपैकी एक आहे. कुंदनहल्ली परिसरात असलेल्या रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेस्टॉरंटमध्ये 3 लोक काम करत होते. जेवणासाठी आलेल्या महिलेसह चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला असावा, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी पैलू असण्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, व्हाईटफील्ड अग्निशमन केंद्राने सांगितले की त्यांना रामेश्वरम कॅफेमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याचा कॉल आला होता. सध्या परिस्थितीचे विश्लेषण केले जात आहे.