लंडन: ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद झाले आहे. जीडीपीम अपेक्षेपेक्षा जास्त घसरण झाल्याम ळे ब्रिटनमध्ये अधिकृतपणे आर्थिक मंदी जाहीर करण्यात आली आहे. सलग दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी आकुंचन पावते, अशावेळी अर्थव्यवस्था मंदीच्या गर्ते त अडकल्याचे स्पष्ट होते. ब्रिटनम धील सकल देशांतर्गत उत्पादनात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे,
असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून आले. अर्थव्यवस्था टक्के ०.१ संकुचित होणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला होता, पण जीडीपीमधील ही घसरण अपेक्षेपेक्षा जास्त आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जीडीपीत ०.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेने ०.१ टक्के नकारात्मक वाढ नोंदवली होती.
नुकत्याच झालेल्या एका सर्वे क्षणात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ०.१ टक्क्यापेक्षा कमी घसरणीचा अंदाज वर्तवला होता. म त्रि, जीडीपीत त्याहून अधिक घसरण झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या काही महिने अगोदर ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीत असत्याचे आकडेवारीतून स्पष्ट आल्याने पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला जवळपास दोन वषारपासून खीळ बसली आहे.
दरम्यान, २०२४ मध्ये बँक ऑफ इंग्लंडने अर्थव्यवस्थेत किंचित सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली आहे. या तिमाहीत सर्व मुख्य क्षेत्रांत घसरण झाली आहे. निर्मिती, बांधकाम आणि घाऊक विक्री क्षेत्रांवर वाढीचा सवारत जास्त ताण आहे. काही प्रमाणात हॉटेल्स आणि वाहन आणि यंत्रसामग्रीच्या भाड्याच्या वाढीमुळे भरपाई झाली आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संचालक लिझ मॅककॉन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.