भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर :  जिल्ह्यातील मौदा शहरात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वंश अंकुश शहाणे हा घराबाहेर खेळत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मौदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आठ दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेत तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील एका गावात पाच महिन्यांच्या बाळाला कुत्र्याने चावा घेतला होता. पोलिसांनी सांगितले की, अर्भकाची आई 14 मे रोजी घरातील कामांसाठी सकाळी त्यांच्या एकल खोलीच्या घरातून बाहेर पडली.

कुत्र्याने घरात घुसून झोपलेल्या बाळावर हल्ला केला. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुलाचे पालक स्टोन पॉलिशिंग युनिटमध्ये काम करतात.  या कुत्र्याला परिसरातील रहिवासी अनेकदा खायला देतात. या घटनेचा राग आल्याने त्यांनी कुत्र्याला ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले.