भरधाव ट्रकने युवकाला चिरडले; तरुणाचा करुण अंत

तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। जळगावच्या रावेर मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील युवकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मनोहर कडू वाघ असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मनोहर कडू वाघ हा रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे आपल्या कुटुंबासोबत रहात होता तसेच तो हातमजुरी करून घर चालवायचा ५ सप्टेंबरला तो दुचाकीने नेरुळ इथे कामावर जात असताना समोरून येणाऱ्या भरघाव ट्र्कने त्याला धडक दिली यात मनोहर दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यावर मनोहरच्या नातेवाईकांनी मनोहरला लगेचच दवाखान्यात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मनोहरच्या परिवारात आई वडील पत्नी आणि मुलगा आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.