अमळनेर: तालुक्यातही नीम या गावी ग्रामपंचायत मध्ये सन २०२१-२२ मध्ये विहार पटने वृक्षलागवड योजना राबवण्यात आली तेव्हा २२० लाभाथ्यांनी सहभाग नोंदवला आणि वृक्षलागवड देखील करण्यात आली. परंतु यात ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक आणि पंचायत समीती नरेगा अधिकाराच्या बेजबाबदारमुळे कामामुळे प्रत्यक्षात लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.
प्रत्यक्षात योजनेचा आढावा घेतल्यास या योजनेअंतर्गत ३ वर्षामध्ये २५२ वृक्षलागवड व संगोपणासाठी रोजगाराची हमी देण्यात आली गावामध्ये योजनेअंतर्गत १९,००० पेक्षा जास्त वृक्ष लागवड केली आणि प्रत्यक्षात २२० लाभार्थीनी सहभाग घेतला. त्याना आता पर्यंत योजने अंतर्गत १.५० कोटी एवढी मजुरी मिळाली पाहिजे होती परंतू प्रत्यक्षात ३० लाखापर्यंत मिळाली आहे म्हणजे प्रत्येकी फक्त ५० दिवसाची मजुरी मिळाली विस्ताराधिकारीच्या चौकशी अहवालांमधये या नुकसानाला सर्वस्वी जबाबदार ग्रामरोजगार सेवक आहे असे निष्पन्न झाले होते त्याची तक्रार लाभार्थ्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कडे केली होती जवळपास सहा महिन्यापासून वारंवार पाठपुरावा केला पण आज पर्यंत याच्यावर काही निर्णय आलेला नाही
या पाश्वभूमीवर सर्व नुकसान ग्रस्त रोजगार २६ जानेवारी रोजी अमळनेर येथील तहसील कार्यालयात उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम असून संबंधीत अधिकारी मात्र काना डोळा करीत असल्याचा आरोप होत आहे.