जळगाव : दिराला मारहाण होत असल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवाहिता भांडण सोडविण्यासाठी गेल्या. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली. विवाहितेचा दीर घरात असताना त्यांना मारहाण करण्यासाठी काही जण त्यांच्या घरात शिरले. यावेळी काही जणांनी विवाहितेचा विनयभंग केला. तसेच गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोनपोत गहाळ झाली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून लाकूडपेठमधील राजेश धर्मा पाटील, सचिन धर्मा पाटील, विनायक किशोर पाटील आणि सचिन पाटील यांचा मुलगा युवराज उर्फ गट्या या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---