नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचा विशेष निवडणूक घोषवाक्यही प्रसिद्ध करण्यात आला आहे
भारतीय जनता पक्षाचे 2014 पासूनचे निवडणूक घोषणावाक्य चर्चेत राहिले आहे. 2014 मध्ये ‘मोदी जी को लाने वाले है अच्छे दिन आने वाले है’ असे घोषणावाक्य होते. त्यानंतर 2019 मध्ये ‘एक बार फिर मोदी सरकार’ असे घोषणावाक्य होते. आता 2024 च्या निवडणूक प्रचारासाठी खास घोषवाक्य तयार केले आहे. ‘सपने नहीं हकीकत को बुनते हैं-तभी तो सब मोदी को चुनते है’। असा नारा पक्षाने दिला आहे. हे घोषणा जनतेतूनच आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. लोकांच्या भावना समजून घेत हे घोषणावाक्य स्वीकारले असल्याचं पक्षाने म्हटले आहे.