भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक ; लोकसभेसाठी मेगाप्लान ठरणार?

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणूक जवळपास दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. याच दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी बैठक होणार आहे. ज्या जागांवर 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती ही बैठक पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत. याच महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.