भाजपतून पारोळ्यातील पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

जळगाव: पक्षविरोधी वर्तन केल्याने पारोळा तालुक्यातील भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे आले आहे. यासंदर्भात भाजपच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी पत्र काढले आहे.गेल्या काही दिवसांपासून पारोळा मंडल अध्यक्ष अनिल गुलाब न पाटील, पारोळा शहराध्यक्ष मनीष भाईदास पाटील, पारोळा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष दीपक पंढरीनाथ अनुष्ठान, जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मोहम्मद युनुस पठाण हे वारंवार पक्षविरोधी वर्तन करीत असत्याच्या तक्रारी भाजप प्रदेशाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची योग्य दखल घेत पक्षाचे अनुशासन भंग केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठी यांनी या कार्यकर्त्यांवर हकालपट्टीची कारवाई केलेली आहे.

करण पवार यांचेही होणार भाजपतून निलंबन
तसेच पारोळ्यातील भाजपचे एरंडोल-पारोळा विधानसभा निवडणूकप्रमुख करण पवार यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे.न त्यांना या पक्षाने जळगाव लोकसभेसाठी उमेदवारीही दिली आहे. मात्र भाजपकडून करण पवार यांना निलंबित करण्यात येणार आहे. करण पवार यांच्या निलंबनासंदर्भात प्रदेशाध्यक्षांकडून पत्र काढण्याचे येणार असल्याचे भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी सांगितले.