भारतीय जनता पक्षाने (भाजप) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कंगनाची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गेल्या वर्षी कुल्लू येथे कंगनाची भेट घेतली होती. या भेटीनंतर कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.
भाजपने नुकतेच त्यांना मंडीतून उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक राजपूत मतदार आहेत. या जागेवर राजपूत आणि ब्राह्मण नेत्यांचे वर्चस्व आहे. कंगना राणौतही राजपूत समाजातून येते. जातीय समीकरण सोडवण्यासाठी भाजपने कंगनाला मैदानात उतरवले आहे.
हिमाचल प्रदेशात भाजप क्लीन स्वीप करेल
आतापर्यंत ही जागा काँग्रेसने 11 वेळा जिंकली आहे, तर 5 वेळा ही जागा भाजपकडे गेली आहे. मात्र, यावेळी हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या सर्व 4 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे. आज तकच्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणानुसार भाजप हिमाचलच्या सर्व 4 जागा काबीज करू शकते.