भाजप आमदार नितेश राणे यांचा “महाविकास आघाडीवर” घणाघात

मुंबई:  महाविकास आघाडीच्या नावाने फिरणारे लोक हे मुघलांचे वंशज आहेत आणि २०२४ ला मुघलाईचा अंत होणार आहे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे, खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. यावरून आज गुरुवारी पत्रकार परिषद घेत नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “इंडी आघाडीला आता काहीही अर्थ राहिलेला नाही. आमच्या नेत्यांना तुम्ही अफजलखानाची उपमा देता पण आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांमुळेच राज्यात खऱ्या अर्थाने शिवशाही आलेली आहे. तुमच्यासारखे मुघलांच्या वंशजांना ठेचण्याची वेळ हे शिवशाहीचं सरकारच करेल असा मला विश्वास आहे.यापुढे नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊत यांचं म्हणणं आहे की, दोन-पाच लाखांच्या गैरव्यवहारासाठी ईडीची नोटीस पाठवून कुटुंबाला हैराण करत आहेत. यांनी खाल्लेली खिचडी ही गरीब कामगारांची होती. त्यामुळे ती त्यांना पचत नाहीये. दोन-पाच लाख काय पण कामगारांचा एक रुपयाही का खाल्ला हा सर्वात मोठा प्रश्न आहे.”